सुरुवात करा
एकत्र कार्य करणारी दोन उत्पादने
आउटलाईनमध्ये दोन एकमेकांशी संबंधित असलेली उत्पादने असतात जी तुम्हाला आणि तुमच्या समुदायाला अखंड इंटरनेट ॲक्सेस देण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात.
Step 1
आउटलाईन व्यवस्थापकासोबत प्रारंभ करा
तुमचा सर्व्हर आउटलाईन व्यवस्थापक डेस्कटॉप ॲप्लिकेशनमधून सेट करा
तुमचा सर्व्हर सेट करणे प्रारंभ करण्यासाठी व्यवस्थापक डेस्कटॉप ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला एकाच ठिकाणी तुमच्या सर्व्हरबाबत प्रत्येक गोष्ट व्यवस्थापित करता यावी यासाठी आम्ही आउटलाईन डिझाइन केले आहे. विश्वसनीय क्लाउड प्रदात्यांच्या एका सचीमधून निवडा किंवा तुम्ही तुमची स्वत:ची Linux संरचना वापरू शकता. एका महिन्याला $5USD किंवा त्यापेक्षा कमी किमतीत अनेक क्लाउड प्रदाते प्लॅन ऑफर करतात.
तुम्ही एकदा व्यवस्थापक डाउनलोड केले की तुम्ही कोणत्या क्लाउड प्रदात्यावर तुमचा सर्व्हर रन करू इच्छिता तो निवडण्यासाठी तुम्हाला प्रॉम्प्ट केले जाईल. काही सर्वाधिक विश्वसनीय प्रदात्यांमधून निवडा जसे की Digital Ocean, AWS, किंवा Google Cloud. एकदा तुम्ही तुमचा क्लाउड प्रदाता निवडला की, ते तुम्हाला त्यांच्या विशिष्ट ऑनबोर्डिंग प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करतील परंतु तुम्ही तुमच्या आउटलाईन व्यवस्थापकामधून तुमचा सर्व्हर व्यवस्थापित करू शकाल.
आउटलाईन तुम्ही तुमचा सर्व्हर कुठे ठेवू इच्छिता ते निवडण्याची अनुमती तुम्हाला देतो. तुमची रहदारी सिंगापूर, जर्मनी किंवा युनायटेड स्टेट्स अशा इतर बऱ्याच देशांमधून मार्गस्थ करा.
Step 2
ॲक्सेस की तयार करा
तुमचे डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी आणि तुमच्या नेटवर्कसोबत ॲक्सेस शेअर करण्यासाठी ॲक्सेस की तयार करा
तुमचा सर्व्हर सेट केल्यानंतर, थेट व्यवस्थापक डेस्कटॉप ॲप्लिकेशनमधून युनिक ॲक्सेस की तयार करा. तुमच्या प्राधान्य दिलेल्या संभाषण प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या सर्व्हरशी कनेक्ट करण्यासाठी व्यवस्थापक तुम्हाला आमंत्रणे पाठवण्याची अनुमती देतो. ॲक्सेस की म्हणजे तुम्ही तुमचे डिव्हाइस आउटलाईन व्यवस्थापकाशी कसे कनेक्ट करता आणि तुमचा सर्व्हर वापरून त्यांचे संरक्षण कसे करता हे होय. प्रत्येक ॲक्सस की ही युनिक असते आणि थेट सर्व्हरवरून व्यवस्थापित केली किंवा हटवली जाऊ शकते. प्रत्येक की ला किती बँडविड्थ वापरण्याची अनुमती आहे हे डेटा मर्यादांमुळे तुम्हाला नियंत्रित करता येते.
तुमचे आमंत्रण स्वीकारणे जितके सोपे आहे तितके तुमच्या सर्व्हरशी कनेक्ट करणे सोपे आहे. तुम्ही एकदा कनेक्ट केले की तुम्ही सहजपणे ॲपमधून तुमचे कनेक्शन चालू आणि बंद करू शकता.
Step 3
डेस्कटॉप किंवा मोबाइलसाठी Outline Client ॲप मिळवा
तुमची युनिक ॲक्सेस की वापरून कनेक्ट करा
App store किंवा Google Play store वरून Outline Client ॲप डाउनलोड करा आणि तुमची युनिक ॲक्सेस की वापरून कनेक्ट करा. क्लायंट ॲप डेस्कटॉप आणि मोबाइल डिव्हाइससाठी उपलब्ध आहे, म्हणून तुम्ही जिथे आहात तिथून आणि तुमच्या सर्व डिव्हाइसवरून तुम्ही मुक्त इंटरनेट ॲक्सेस करू शकता आणि खाजगीपणे संभाषण करू शकता.
तुम्ही तुमचे स्वत:चे डिव्हाइस कनेक्ट केले की तुम्ही तुमच्या सर्व्हरचा ॲक्सेस तुमच्या मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत शेअर करू शकता. युनिक ॲक्सेस की तयार करा आणि तुमच्या नेटवर्क मधील ज्या कोणासही इंटरनेटचा फिल्टर न केलेला ॲक्सेस हवा आहे त्यास त्या पाठवा. तुमच्या नेटवर्कमधील एखादी व्यक्ती खूप बँडविड्थ वापरत असल्यास, वापर मर्यादित करण्याचा पर्याय तुम्हाला देणाऱ्या डेटा मर्यादांसह तुमच्या सर्व्हरचा ॲक्सेस व्यवस्थापित करा
पर्यायी लिंक वापरा. Client रन करण्यासाठीच्या आवश्यकता जाणून घ्या.
तुम्ही जे शोधत आहात ते सापडत नाही का?
आमचे सपोर्ट पेज पहा.
आउटलाईन वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)